साताऱ्यातून दोन दुचाकी चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:35+5:302021-09-17T04:46:35+5:30
सातारा : शहर व परिसरातून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या असून, बुधवारी शहरातून दोन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. या ...

साताऱ्यातून दोन दुचाकी चोरीस
सातारा : शहर व परिसरातून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या असून, बुधवारी शहरातून दोन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. या दोन्ही घटनांची नोंद सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
साताऱ्यातील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या पार्किंमध्ये लावण्यात आलेली दुचाकी (एमएच ११ सीए ७४११) अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रकाश एकनाथ पवार (वय ५२, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसरी घटना राधिका रोड शेजारील कृषी बाजार समिती समोरील पार्किंगध्ये घडली. निरंजन रविकांत भवर (वय २३, रा. गोवे, ता. सातारा) यांनी या ठिकाणी दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची ही दुचाकी दुपारी साडेचारच्या सुमारास चोरून नेली.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शहरात दुचाकीचे चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलिसांनी या दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.