शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी विसर्ग वाढवला, पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू 

By नितीन काळेल | Updated: November 27, 2023 15:30 IST

पाण्याची मागणीही वाढणार असल्याने राजकीय वाकयुध्दही रंगू लागले

सातारा : कोयना धरणातूनसांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी दोन टीएमसी पाणी सोडण्यात येत असून आता पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याचा वेग वाढून २१०० क्यूसेकवर गेला आहे. तर सांगलीतील सिंचनासाठी दोन महिन्यांत तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आलेले आहे.कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे.या धरणातील पाण्यावर सिंचनाच्या तीन मोठ्या पाणी योजना अवलंबून आहेत. सिंचनासाठी सर्वाधिक पाणी सांगलीला जाते. यावर्षी कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला. परिणामी धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. पाणीसाठा ९४ टीएमसीपर्यंत गेलेला. त्यामुळे यंदा वीजनिर्मिती आणि सिंचनाच्या पाणी तरतुदीत कपात होणार असा अंदाज होता. त्यानुसार नियोजन प्रस्तावित केलेले आहे. त्याचबरोबर कमी पावसामुळे राज्यात दुष्काळी स्थिती आहे. सांगली जिल्ह्यातही दुष्काळी स्थिती गडद होत चालली आहे. पिण्याच्या पाणी योजनांसह सिंचन पाण्यावर परिणाम झालेला आहे. सिंचनासाठी पाणी मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाणी मागणी झाली होती. यासाठी शनिवारपासून कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते. मात्र, सिंचनासाठी पाण्याची आणखी मागणी वाढल्याने पायथा वीजगृहाचे दुसरे युनिटही सुरू करण्यात आले. त्यामुळे कोयनेतून आता २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सांगलीसाठी सुरू झाला आहे. एकूण दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. तर सांगलीतील सिंचनासाठी यापूर्वी दोनवेळा पाणी सोडण्यात आले होते.

धरणात ८५ टीएमसी पाणीसाठा..कोयना धरणातील पाणीपातळी कमी होत चालली आहे. सध्या ८५ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी पावसाळ्यापर्यंतच्या सहा महिन्यांसाठी पुरवायचे आहे. त्यातच पाण्याची मागणीही वाढणार असल्याने राजकीय वाकयुध्दही रंगू लागले आहे. उन्हाळ्यात तर पाण्याचे संकट आणखी गहिरे होण्याची भीती आहे. त्याचबरोबर कोयनेप्रमाणचे उरमोडी धरणातील पाण्याबाबतही वाद वाढत चालले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी