दोन चोरांना 2 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

By Admin | Updated: March 25, 2017 20:22 IST2017-03-25T20:22:13+5:302017-03-25T20:22:13+5:30

एका हॉटेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

Two thieves, two years of hard labor education | दोन चोरांना 2 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

दोन चोरांना 2 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

>ऑनलाइन लोकमत
महाबळेश्वर (सातारा), दि. 25 - एका हॉटेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ऐलान शेख (वय २४, रा. गवळी मोहल्ला) व सुशील सुर्वे (२३, रा. रांजणवाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, क्षेत्र महाबळेश्वर-डचेस रोड येथील हॉटेल गौरीशमध्ये गोव्याचे पर्यटक गुरुनाथ बांदोडकर व अमेय बांदोडकर हे १७ जून २०१६ रोजी आले होते. याच दिवशी पहाटेच्या सुमारास ऐलान शेख व सुशील सुर्वे या दोघांनी बांदोडकर यांच्या खोलीच्या खिडकीचा दरवाजा उघडून खोलीतील दोन मोबाईल व इतर वस्तू असा ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. 
बांदोडकर यांनी याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
 
 
पोलीस निरीक्षक राजेंद्र्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून ऐलान शेख व सुशील सुर्वे यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. तसेच त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद केला होता. यानंतर संबंधितांवर न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले.
 
दरम्यान, शनिवारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. न्यायमूर्ती पी. ए. कुंभोजकर यांनी साक्ष व पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना चोरीच्या गुन्ह्यात दोषी धरून त्यांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि २५० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. बी. एन. पेटकर यांनी काम पहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Two thieves, two years of hard labor education