शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: पिस्तूल बाळगणारे दोन संशयित ताब्यात, कराड पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:17 IST

१ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कराड : कराड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध कारवाई करून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, मोबाइल फोन आणि दुचाकीसह एकूण १ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या आदेशानुसार, कराड व मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय आणि अग्निशस्त्रधारकांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली.शुक्रवार, दि. ०७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी कराडच्या पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, अल्तमश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी (वय २५, रा. पालकरवाडा मंगळवार पेठ, कराड) व ओमकार दीपक जाधव (२२, रा. होली फॅमिली हायस्कूलजवळ, विद्यानगर सैदापूर, ता. कराड) हे दोघे मौजे सैदापूर गावच्या हद्दीतील कॅनॉल परिसरात बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगून वावरत आहेत.त्यामुळे पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी तत्काळ आपल्या कार्यालयातील पथकास सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून संशयित दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान संशयितांकडून पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल, सहाशे रुपयाचे एक जिवंत काडतूस, पंधरा हजार रुपयांचा एक स्मार्ट मोबाइल फोन, ७५ हजार रुपयांची दुचाकी, असा १ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, पोलिस अंमलदार प्रवीण पवार, सागर बर्गे, प्रशांत चव्हाण, मयूर देशमुख यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Two arrested in Karad for possessing illegal firearms.

Web Summary : Karad police arrested two suspects with an illegal pistol, live cartridge, mobile phone, and motorcycle worth ₹1.4 lakh. The operation was conducted due to upcoming elections. The accused were found with the weapon near Saidapur.