शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 10:49 IST

ट्रक चालक, निर्जनस्थळी बसणारी जोडपी तसेच वाटसरूंना तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ३३ मोबाईल व सीमकार्ड, १० मेमरी कार्ड असा सुमारे १ लाख २५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देतलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोघांना अटकचोरीचे ३३ मोबाईल जप्त : पाच गुन्ह्यांची कबुली

सातारा : ट्रक चालक, निर्जनस्थळी बसणारी जोडपी तसेच वाटसरूंना तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ३३ मोबाईल व सीमकार्ड, १० मेमरी कार्ड असा सुमारे १ लाख २५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.महेश जयराम जगदाळे (वय २५, रा. कांबळेश्वर, ता. बारामती. जि. पुणे), प्रवीण उर्फ गोट्या संजय करनोर (वय २४, रा. मठाचीवाडी, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, जिंती नाका, ता. फलटण येथे दोघेजण चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह तेथे सापला लावला. त्यावेळी जगदाळे आणि करनोर हे दोघे दुचाकीवरून त्या ठिकाणी आले.

पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पवारवाडी, ता. फलटण येथील पेट्रोलपंपावर तलवारीचा धाक दाखवून रोकड चोरून नेल्याची कबुली दिली. त्यांच्याजवळ ११ मोबाईल सापडले. हे मोबाईल कुठून आणलेत, अशी विचारणा पोलिसांनी केल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर आली.

ट्रक चालकांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोकड चोरून नेत होते. तसेच निर्जनस्थळी फिरणाऱ्या जोडप्यांचे आणि दारूच्या नशेत फिरणाऱ्या लोकांकडून ते जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेत होते. त्यांच्याजवळ सापडलेली दुचाकी वारजे (पुणे)माळवाडी येथून चोरली असल्याची कबुली त्यांनी दिली. अत्तापर्यंत त्यांच्याकडून चोरीचे ३३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.या दोघांवर फलटण ग्रामीण तसेच लोणंद पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांकडून आणखी अशा प्रकारच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, पुढील तपासाठी या दोघांना फलटण ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर