दोन पोलिसांची साक्ष पूर्ण

By Admin | Updated: June 12, 2014 00:43 IST2014-06-12T00:42:25+5:302014-06-12T00:43:40+5:30

महाराष्ट्र केसरी संजय पाटील खुन खटला सुनावणी

Two police witnesses full | दोन पोलिसांची साक्ष पूर्ण

दोन पोलिसांची साक्ष पूर्ण

सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील खुन खटल्याच्या सुनावणीदरम्यान बुधवारी दोन पोलिसांसह आणखी एकाची साक्ष पूर्ण झाली.
हवालदार उत्तम दबडे म्हणाले, ‘संजय पाटील यांचा खून झाल्यानंतर मी सलीम शेख याच्या घरी गेलो. त्यावेळी त्याची पत्नी घरात होती.माझा मोबाइल नंबर तिला देवून सलीम शेखला फोन करायला सांगितले.
घटनेच्या चौथ्या दिवशी सलीम शेखने कऱ्हाड आल्याचा फोन केला. त्यावेळी मी वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही सर्वजण काहीवेळातच तेथे पोहोचले.
सलीमसमवेत आणखी तीघे होते. सर्व आरोपींना बुरखा घालून आम्ही पोलीस ठाण्यात त्यांना नेले.’
हवालदार रामचंद्र पानवळ यांचीही घटनेवेळी जप्त केलेली कपड्यासंदर्भात साक्ष झाली. ‘कऱ्हाड खेरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण म्हणाले, कोयना सहकारी बँक ही रयत बजारच्या इमारतीमध्ये असून कोयना खरेदी विक्री संघांच्या मालकीची आहे. यातील २००७ ते २०१२ या कालावधीच्या भाडेकराराची मूळ प्रत खरेदी विक्री संघाकडे नाही.’
दरम्यान या तिघांच्या साक्षी पूर्ण झाल्यानंतर या खटल्याची पुढील सुनावणी २३ आणि २४ जूला होणार असल्याचे न्यायाधिशांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Two police witnesses full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.