महाराष्ट्राच्या रग्बी संघात साताºयाचे दोन खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 16:39 IST2017-08-17T16:39:11+5:302017-08-17T16:39:40+5:30

Two players of SATA in Maharashtra's Rugby team | महाराष्ट्राच्या रग्बी संघात साताºयाचे दोन खेळाडू

महाराष्ट्राच्या रग्बी संघात साताºयाचे दोन खेळाडू

सातारा : ‘रग्बी असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’च्या वतीने नागपूर येथे सिनिअर गट मुले व मुलींच्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला. 

सातारा जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत चतुर्थ क्रमांक पटकाविला. संपूर्ण स्पर्धेतून बिहार येथे होणाºया राष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी प्रत्येकी १२ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला. यामध्ये सातारा रग्बीचे दिपराज राजेभोसले व तुषार धुमाळ यांची अंतिम १२ खेळाडूंमध्ये निवड झाली.

या खेळाडूंना सातारा रग्बीचे मुख्य प्रशिक्षक मनोज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Two players of SATA in Maharashtra's Rugby team