जिल्हा परिषदेच्या आणखी दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:41 IST2021-05-06T04:41:38+5:302021-05-06T04:41:38+5:30

फोटो : जिल्हा परिषदेतून लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा ...

Two more Zilla Parishad employees die | जिल्हा परिषदेच्या आणखी दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

जिल्हा परिषदेच्या आणखी दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

फोटो : जिल्हा परिषदेतून

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचारीही बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचारी रुग्णसंख्या ११८६ झाली असून आणखी दोघा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने आतापर्यंत २० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर ८५६ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावांबरोबरच शासकीय विभागांतही कोरोनाचा शिरकाव झाला तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, कृषी आदी विभागांत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोना बाधित होत आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ११८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सातारा तालुक्यात कार्यरत जिल्हा परिषदेच्या १९३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर कऱ्हाडमध्ये १५०, कोरेगाव १५४, खटाव १०२, खंडाळा ४८, जावळी २९, पाटण ८७, फलटण १७५, महाबळेश्वर ४५, माण १२० आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ८३ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा २० वर पोहोचला आहे. यातील दोघांचा मृत्यू तीन दिवसांत झाला आहे.

कोरोना विषाणूमुळे खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पाटण तालुक्यातील तिघांचा तर कोरेगाव, जावळी, फलटण, सातारा आणि माण तालुक्यातील प्रत्येकी २ व कऱ्हाड, महाबळेश्वर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी गेला आहे.

....................................................

Web Title: Two more Zilla Parishad employees die