शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

सातारा जिल्ह्यात आणखी दोन लाल दिवे; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली 

By नितीन काळेल | Updated: June 18, 2024 21:18 IST

राष्ट्रवादीतून मकरंद पाटील, भाजपमधून शिवेंद्रसिंहराजे, जयकुमार दावेदार 

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्यमंत्रीमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असून, पाठीमागे स्वत:हून दूर राहिलेल्या आमदार मकरंद पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते, तर भाजपमधूनही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सध्या जिल्ह्यात एक मंत्रिपद असले, तरी आणखी दोन मंत्र्यांची भर पडू शकते, असे सध्याचे तरी चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यातच ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची नाराजी दूर करणे आणि महायुतीची ताकद वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पुढील आठवड्यात राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो. यासाठी महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांत याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात विस्तार होऊ शकतो. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही अनेकजण इच्छुक आहेत. अनेकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.

सातारा जिल्ह्यालाही या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळू शकते. राष्ट्रवादीकडून वाईचे आमदार मकरंद पाटील हे दावेदार आहेत. एक वर्षापूर्वी अजित पवार महायुतीबरोबर गेल्यावर ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदासाठीचे १० वे नाव हे मकरंद पाटील यांचे होते. पण, त्यावेळी ते स्वत:हून बाजूला राहिले. या विस्तारातही ते दावेदार आहेत. अजित पवार कोणाला ताकद देणार हे लवकरच स्पष्ट होईल, तर भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे दावेदार आहेत. आमदार गोरे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. भाजपमधून दोघांची नावे आघाडीवर असली, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला झुकते माप देणार याकडे लक्ष असणार आहे. त्यातच जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्याला आणखी एक मंत्रिपद देऊन पक्षाची ताकद आणखी वाढविण्याचा भाजपचा विचार असणार आहे, तर शिंदेसेनेकडून शंभूराज देसाई मंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट आहे.

नवीन मंत्र्यांना तीन महिने मिळणार...

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर तो अधिवेशनापूर्वीच होऊ शकतो. तसे झाले, तर नवीन मंत्र्यांना फक्त तीन महिनेच कालावधी मिळू शकतो. कारण, ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही निवडणूक आचारसंहिता लागू शकते, तर अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता धूसर आहे.

खासदारकी की मंत्रिपद...लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाई येथे सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी कसे विनवले होते हे स्पष्ट केलेले, तसेच अजितदादांनी त्यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर खासदार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मकरंद पाटील यांना मंत्रिपद दिले, तर नितीन पाटील यांना सध्यातरी खासदारकीपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा