लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या घरातून दोन मोबाईल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:14 IST2021-03-04T05:14:32+5:302021-03-04T05:14:32+5:30

सातारा : येथील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका परप्रांतीय लेबर सप्लायर कॉन्ट्रॅक्टरच्या घरातून दोन मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार सातारा ...

Two mobile phones stolen from labor contractor's house | लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या घरातून दोन मोबाईल चोरी

लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या घरातून दोन मोबाईल चोरी

सातारा : येथील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका परप्रांतीय लेबर सप्लायर कॉन्ट्रॅक्टरच्या घरातून दोन मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, गोविंद अवधेश यादव (वय ४५, मूळ रा. ग्राम मानुबरवा, पोस्ट मडकडा, ता. बहरज, जि. जेवरिया, राज्य - उत्तरप्रदेश. सध्या रा. द्वारा - शोभा ज्ञानेश्वर शिर्के, रहिमतपूर रोड, संभाजीनगर, कोडोली, सातारा) हे कामगार पुरवण्याचा व्यवसाय करतात. मंगळवार, दि. २ रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ते भाड्याने राहत असलेल्या घरात अज्ञाताने प्रवेश केला . घरातील टेबलवर ठेवलेला पाच हजार रुपये किमतीचा आणि पाचशे रुपयांचा मोबाईल चोरुन नेला. याप्रकरणी गोविंद यादव यांनी मंगळवार, दि. ३ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.

Web Title: Two mobile phones stolen from labor contractor's house