शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोन युवकांकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:06 IST

कोरेगाव शहरातील एका हॉटेलमध्ये गावठी कट्टा विक्रीस घेऊन येणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे आणि दुचाकी असा सुमारे १ लाख ७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

ठळक मुद्देदोन युवकांकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे जप्तविक्रीचा प्रयत्न : कोरेगावात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कोरेगाव : शहरातील एका हॉटेलमध्ये गावठी कट्टा विक्रीस घेऊन येणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे आणि दुचाकी असा सुमारे १ लाख ७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.नवनाथ हिंदुराव लोहार (वय ३४, रा. कुमठे, ता. कोरेगाव), संदीप धनाजी पाटसुते (वय ३५, रा. मरळी, ता. पाटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, लोहार आणि पाटसुते हे दोघे कोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह रविवारी रात्री सापळा रचला.

दुचाकीवरून आलेल्या दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता लोहारच्या खिशामध्ये एक गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतुसे पोलिसांना सापडली. या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेत आणल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि फसवणुकीचा गुन्हा आणि कोरेगाव पोलीस ठाण्यात मारामारीसारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. मात्र, हे दोघे गावठी कट्टा कोणाला व कशासाठी विकणार होते, हे अद्याप त्यांच्या चौकशीत समोर आले नाही.पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नाईक मोहन नाचण, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन व गणेश कचरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर