शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कारागृहात दोन कैद्यांमध्ये राडा, भलतच आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 17:54 IST

जेल प्रशासनास हा प्रकार सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशीही त्याने धमकी दिली.

सातारा : शरीराशी लगट करू देत नसल्याच्या कारणावरून एका कैद्यांने दुसऱ्या कैद्यांला बेदम मारहाण केल्याची घटना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात घडली. याप्रकरणाची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित कैद्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. काल, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हा राडा झाला. विकास भीमराव बैले (रा. कुशी, ता. पाटण) असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकास बैले हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच बॅरेकमध्ये दुसरा बंदिजन अक्षय दिनकर यादव हा सुद्धा वास्तव्यास आहे. शुक्रवारी सायंकाळी विकास बैले याने अक्षयच्या शरीराशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अक्षयने त्याला विरोधात केल्याने विकास बैले याने त्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर फाईट मारल्याने तो गंभीर जखमी झाला. जेल प्रशासनास हा प्रकार सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशीही त्याने धमकी दिली.परंतु काही वेळानंतर या प्रकाराची माहिती कारागृहातील पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ बॅरेकमध्ये धाव घेऊन दोघांना वेगळे केले. त्यानंतर विकास बैले याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कारागृहातील हवालदार सखाहरी शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक ए.ए. वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी