भरधाव कारच्या धडकेत दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:48+5:302021-01-08T06:07:48+5:30
वाई : साताऱ्याहून वाईकडे निघालेल्या भरधाव निघालेल्या कारने साताऱ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला बावधन ओढा परिसरात जोरदार धडक दिली. या ...

भरधाव कारच्या धडकेत दोन जखमी
वाई : साताऱ्याहून वाईकडे निघालेल्या भरधाव निघालेल्या कारने साताऱ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला बावधन ओढा परिसरात जोरदार धडक दिली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले. कार चालकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जखमींना उपचारांसाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वनिता प्रवीण भोसले (वय ३५, केसरकर पेठ, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या व पती प्रवीण हे दुचाकीवरून रविवारी दुपारी वाईला किसन वीर महाविद्यालयात पुस्तके आणण्यासाठी गेले होते. प्रवीण हे गाडी चालवीत होते. वनिता या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. तेथील काम झाल्याने परत सातारच्या दिशेने निघाले होते. बावधन ओढ्यानजीक दोन वाजण्याच्या सुमारास साताऱ्याकडून वाईकडे येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात वनिता व प्रवीण हे दोघेही दुचाकीवरून लांब फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मोटारचालक राजेंद्र रामचंद्र रसाळ (रा. सह्याद्रीनगर) यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुभाष धुळे तपास करीत आहेत.