शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Satara: गर्भलिंग निदान प्रकरणात दोन डॉक्टरांचा सहभाग निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 11:54 AM

फलटण येथील पिंप्रद गावाजवळील एका उसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले होते

सातारा : फलटण येथील उसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डाॅक्टर, तसेच चाचणीनंतर गर्भवती महिलेचा गर्भपात करणाऱ्या डाॅक्टरचे नाव वाई पोलिसांच्या तपासांत निष्पन्न झाले असून, या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे कनेक्शन समोर आले आहे. संबंधित एका डाॅक्टरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांना अटक करण्यासाठी वाई पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे तपासी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.फलटण येथील पिंप्रद गावाजवळील एका उसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले होते. त्यानंतर पोलिसांनी या फडात गर्भलिंग निदान चाचणीसाठी गेलेल्या महिलेसह तिचा नातेवाईक आणि एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता. वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक फाैजदार विजय शिर्के यांनी, तसेच त्यांच्या पथकाने गेल्या महिनाभरापासून या प्रकरणाचा तपास केला. त्यामध्ये माळशिरसचे कनेक्शन समोर आले.फलटणच्या उसाच्या फडात गर्भलिंग निदान चाचणी केल्यानंतर संबंधित गर्भवती महिलेने माळशिरस येथे जाऊन एका डाॅक्टरांकडे गर्भपात केल्याचे तपासांत समोर आले. त्यानंतर वाई पोलिसांचे एक पथक संबंधित डाॅक्टरला अटक करण्यासाठी माळशिरसला गेले. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संबंधित डाॅक्टर पसार झाले, तर दुसरीकडे फलटण येथील उसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डाॅक्टरही पसार झाले आहेत. हे डाॅक्टरही अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत, तेही फरार आहेत. पोलिसांनी अटक करू नये म्हणून माळशिरसमधील संबंधित डाॅक्टरांनी वाई न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून, या अर्जावर सोमवारी (दि. ५) सुनावणी होणार आहे.

‘ते’ कायद्याच्या पळवाटा शोधताहेत..पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे. संबंधित डाॅक्टरांच्या मागावर वाई पोलिस असून, संशयित आरोपींची पळताभुईथोडी झाली आहे. पोलिस ठाण्यात हजर होण्यापेक्षा ते कायद्याच्या पळवाटा शोधत असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAbortionगर्भपातdoctorडॉक्टर