ओगलेवाडीत दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST2021-04-19T04:36:05+5:302021-04-19T04:36:05+5:30
हजारमाची आणि ओगलेवाडी गावात गत काही दिवसापासून दररोज सुमारे दहा रुग्ण वाढत आहेत. सद्यस्थितीत ४१ बाधित गावात आहेत. या ...

ओगलेवाडीत दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’
हजारमाची आणि ओगलेवाडी गावात गत काही दिवसापासून दररोज सुमारे दहा रुग्ण वाढत आहेत. सद्यस्थितीत ४१ बाधित गावात आहेत. या रुग्णवाढीने गंभीर परिस्थितीचा गावाला सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विद्या घाबडे होत्या. यावेळी तलाठी श्रीकृष्ण मर्ढेकर, उपसरपंच प्रशांत यादव, ग्रामसेवक एन. व्ही. चिंचकर, कल्याणराव डुबल यांची प्रमुख उपस्थिती होती.
ओगलेवाडी ही या भागातील गावांची प्रमुख बाजारपेठ आहे. तर येथील भाजीमंडई प्रसिद्ध आहे. शेतकरी शेतातील ताजा भाजीपाला थेट विक्रीसाठी घेऊन येत असल्यामुळे येथे खरेदीसाठी मोठी गर्दी असते. गत काही दिवस येथे सापडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ध्वनिक्षेपकावरून मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात धुणे, एका ठिकाणी गर्दी करू नये अशा सूचना देण्यात येणार आहेत. जनजागृती बरोबरच नियम न पाळणाऱ्या व्यापारी व व्यावसायिकांविरोधात दंडात्मक कारवाई करून दुकान सील केले जाणार आहे. या बैठकीला अवधूत डुबल, जगन्नाथ काळे, शरद कदम, पितांबर गुरव, विनोद डुबल, सीता माने, सारिका लिमकर, संगीता डुबल, ऐश्वर्या वाघमारे, दीपक लिमकर, पराग रामुगडे, सतीश जांभळे, धनाजी माने, संजय लिमकर उपस्थित होते.