शेतातील रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:37 IST2021-03-21T04:37:48+5:302021-03-21T04:37:48+5:30

फलटण : शेत रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मुंजवडी (ता. फलटण) ...

Two beaten in a farm road dispute | शेतातील रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण

शेतातील रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण

फलटण : शेत रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मुंजवडी (ता. फलटण) येथील चौघांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत बाळासाहेब जिजाबा निंबाळकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार, दि. १७ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्यासुमारास निंबाळकर यांच्या घरासमोर त्यांना व त्यांचा मुलगा नितीन बाळासाहेब निंबाळकर यास शेतात जाण्याचा रस्ता का अडविला, असे म्हणत अमोल बन्यासाहेब निंबाळकर, बन्यासाहेब जिजाबा निंबाळकर, तुळशीराम किसन निंबाळकर, किसन जिजाबा निंबाळकर (सर्व रा. मुंजवडी) यांनी कोयता, दगड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी चौघांविरुध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक फौजदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.

Web Title: Two beaten in a farm road dispute