शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

Satara: तीस ठिकाणचे सीसीटीव्ही पाहिले; मग, चोरटे निष्पन्न केले; वसुली अधिकाऱ्यास लुटणाऱ्या दोघांना अटक

By नितीन काळेल | Updated: July 14, 2023 19:15 IST

भुईंज पोलिसांची कारवाई : संशयित दोघेही सोलापूर जिल्ह्यातील

सातारा : खासगी कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला दुचाकी आडवी मारुन लुटणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील दोघांना भुईंज पोलिसांनी अटक केली. यासाठी पोलिसांनी ते ज्या मार्गावरुन गेले तेथील ३० ते ३५ ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. त्यानंतर संबंधितांना पकडले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ४ जुलै रोजी वाई तालुक्यातील केंजळ गावच्या हद्दीत दुचाकीवरील अनोळखी दोघांनी गाडी आडवी मारुन खासगी कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला लुटले होते. तसेच त्यांच्याजवळील १ लाख ५० हजार रुपयांची रोखड, कंपनीचे पावती पुस्तक, आधारकार्ड, पॅनकार्ड आदींसह इतर कागदपत्रे जबरदस्तीने नेली होती. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर वाईचे पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी भुईज पोलिसांना तपासाची सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा केल्यानंतर चोरटे ज्या मार्गाने गेले. त्या रस्त्यावरील ३० ते ३५ ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी निष्पन्न केली. तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे दोघे चोरटे हे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपूरी (ता. माळशिरस) येथील असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पोलिस पथकाला पाठवून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. अजय मोहन पाटोळे आणि दीपक नाना जाधव (दोघेही रा. धर्मपुरी) अशी त्यांची नावे आहेत.या कारवाईत भुईंज ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक भंडारे, उमाप, हवालदार नितीन जाधव, रवीराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस