अडीच लाख रुपयांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:42 IST2021-04-02T04:42:01+5:302021-04-02T04:42:01+5:30

वाई : सोनगिरवाडी ता. वाई येथील विलीस एफपीअर्स मेमोरिअल हॉस्पिटलच्या कॅशिअर रूममधून चोरट्याने ड्रॉवर उचकटून २ लाख ५७ हजार ...

Two and a half lakh rupees in cash | अडीच लाख रुपयांची रोकड लंपास

अडीच लाख रुपयांची रोकड लंपास

वाई : सोनगिरवाडी ता. वाई येथील विलीस एफपीअर्स मेमोरिअल हॉस्पिटलच्या कॅशिअर रूममधून चोरट्याने ड्रॉवर उचकटून २ लाख ५७ हजार ११३ रुपये रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, सोनगिरवाडी (ता. वाई) येथील विलीस एफ पीअर्स मेमोरिअल हॉस्पिटलच्या कॅशिअर रूमचे कुलूप बुधवार, दि. २४ रोजी तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करीत ड्रॉवर उचकटले. त्यामधील २ लाख ५७ हजार ११३ रुपयांची रोख रक्कम लंपास केले. ही तक्रार स्टेला तिलसराव शिर्के वय ३५, रा. मिशन हॉस्पिटल कॉटेज, सोनगिरवाडी, ता. वाई यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी बरडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर तपास करीत आहेत.

Web Title: Two and a half lakh rupees in cash