शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांचं ऑनलाईन नेतृत्व शेतकऱ्यांच्या बांधावर, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 

By नितीन काळेल | Updated: September 8, 2023 19:33 IST

रोहित पवारांना म्हणाले आपलं फाटलेलं आभाळ पाहावं..

सातारा : अडीच वर्षे ऑनलाईन नेतृत्व केले. शेतकऱ्यांच्या बांधावर कधी गेले नाहीत. असे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दुष्काळ पाहणी दाैरा करत आहेत. त्यांच्याकडून चांगले काम करणाऱ्या शासनाला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असा हल्लाबोल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. तर आमदार रोहित पवार यांना आपलं आभाळ फाटलं आहे ते पहावं, असेच एकप्रकारे सुनावले.येथील शासकीय विश्रामागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘राज्य शासन दुष्काळाबाबत संवेदनशील आहे. आताच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याबाबत कॅबिनेटमध्येही चर्चा झाली आहे. पण, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नगर जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दाैऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, पाहणीही करावी याबाबत आमचे दुमत नाही. मात्र, सतत ‘शासन आपल्या दारी’वर टीका करत आहेत. हा चांगला उपक्रम असून दीड कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.

पण, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांना जिल्ह्यांचे दाैरे करण्याचा आग्रह आम्ही करत होतो. त्यावेळी त्यांनी कोरोना, लाॅकडाऊनचे कारण दिले. आमची विनंती कधीही मान्य केली नाही. अडीच वर्षे आॅनलाईन नेतृत्व करणारे कधीही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. त्यांना आताच्या शासनाचं काम पाहवत नाही हे दुर्दैव आहे. त्यांनी अजुनही टीका केली तरी आमचे चांगले काम सुरूच राहील.

आमचे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असे सांगून पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले, ‘नियमीत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उध्दव ठाकरे यांनी अनुदान दिले नाही. पण, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आल्यानंतर शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटींहून अधिक रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले. अतिवृष्टीत पिकांचे नुकसान झाल्यानंतर ठाकरे यांनी केंद्र शासन आणि एनडीआरएफच्या निकषांकडे बोट दाखवले. पण, आम्ही निकष बदलून शेतकऱ्यांना मदत केली. कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले.यावेळी पालकमंत्री देसाई यांना मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न केल्यावर त्यांनी इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा सामाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सरकार संवेदनशील आहे. मुख्यमंत्री शिंदे हेच आरक्षण देतील असे स्पष्ट केले. तर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा टाकल्याच्या प्रश्नावर त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन जरुर करावे, निवेदन द्यावे. पण, अंगावर भंडारा फेकण्याची पध्दत योग्य नाही, असे बोलून झाल्याप्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

‘त्यांनी’ पाहुण्यासारखं यावं..

माण तालुक्यातील दहिवडी येथे राष्ट्रवादीचा मेळावा झाला होता. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दुष्काळी पाहणी दाैरा केला नसल्याची टीका केली होती. या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न केल्यावर मंत्री देसाई यांनी ‘रोहित पवार यांनी जिल्ह्यात पाहुण्यासारखं यावं. पण, त्यांनी आपलं फाटलेलं आभाळ पहावं, असे निक्षून सांगितले. यावरुन देसाई यांचा रोख राष्ट्रवादीत दुसरा गट केलेल्या अजित पवार यांच्याकडेच असल्याची चर्चाही सुरु झाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरेRohit Pawarरोहित पवार