कऱ्हाडनजीक दोन अपघात

By Admin | Updated: June 7, 2014 00:09 IST2014-06-07T00:09:00+5:302014-06-07T00:09:29+5:30

मालट्रक उलटला : कार अपघातात एकजण गंभीर

Two accidents in Karhangad | कऱ्हाडनजीक दोन अपघात

कऱ्हाडनजीक दोन अपघात

मलकापूर : महामार्गावर मलकापूर व वहागाव येथे दोन वेगवेगळे अपघात झाले़ या अपघातांमध्ये एकजण गंभीर जखमी झाला तर वाहनांसह साहित्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले़
मलकापूर येथे महामार्गानजीकच्या नाल्यात मालट्रक पलटी झाला़ वादळी वाऱ्यामुळे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नांदलापूर येथे महामार्गावरच झाड कोसळले होते़ वाहतुकीची कोंडी झाल्याने पोलिसांनी कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक उपमार्गावरून वळवली़ मक्याची पोती घेऊन सांगलीहून पुण्याकडे निघालेला ट्रक उपमार्गावरून जात असताना मलकापूर येथील एऩ पी़ मोटर्ससमोर महामार्गावर जाण्यासाठी केलेल्या कच्च्या रस्त्यावरून चालकाने मालट्रक नेण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी चाक नाल्यात जाऊन ट्रक पलटी झाला़ ट्रकमधील मका महामार्गासह नाल्यात पडला़ या अपघातामुळे पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली़ सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही़ अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसात झाली आहे़
पुण्याहून सांगलीकडे निघालेली कार शुक्रवारी सायंकाळी वहागाव येथे महामार्गावरच पलटी झाली़ या अपघातात शिवाजीराव बाळासाहेब पाटील (वय ५५, रा़ कौलापूर) हे जखमी झाले़ शिवाजीराव पाटील हे कारमधून (क्ऱ एम़ एच़ १० बी़ ए़ ८३७८) सांगलीकडे जात असताना वहागावनजीक त्यांचा कारवरील ताबा सुटला़ त्यामुळे कार कोल्हापूर-सातारा लेनवर जाऊन तीनवेळा पलटी झाली़ अपघातात जखमी झालेल्या शिवाजीराव पाटील यांना महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा व नीलेश पवार यांनी उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Two accidents in Karhangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.