शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी वीस लाख रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 15:55 IST

corona virus Satara : माण तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णसंख्येत भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देकोरोनाविरोधातील लढ्यासाठी वीस लाख रुपये! माण पंचायत समिती : अौषधोपचारासोबतच जनजागृतीसाठी खर्चाची तरतूद

दहिवडी : माण तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णसंख्येत भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला.माण तालुक्यात दीड हजार कोरोनाबाधित आहेत. तुलनेत आरोग्य सुविधा अपुरी आहे. चार व्हेंटिलेटर, २७ ऑक्सिजन बेड आहेत. कोविड सेंटरमध्ये विलगीकरण बेडची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना इतर तालुक्यात, शहरात अथवा जिल्ह्यात भटकावे लागते.

कोरोना सेंटरमध्ये योग्य सुविधा वा जागा उपलब्ध नसल्याने अनेकजण घरीच अलगीकरणात आहेत. अनेक रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या फॅबिफ्ल्यू या गोळ्या मिळत नाहीत. ऑक्सिजन अभावी कित्येकजण तडफडत आहेत. तालुक्यातील नेतेमंडळी तसेच सामाजिक संस्थांनी कोरोना सेंटरसाठी पुढाकार घेतला आहे. परंतु अजूनही मदतीची आवश्यकता आहे.ही परिस्थिती लक्षात घेवून पंचायत समितीचे प्रभारी सभापती तानाजी कट्टे-पाटील व सहकारी रमेश पाटोळे, कविता जगदाळे, नितीन राजगे, विजयकुमार मगर, तानाजी काटकर, लतिका विरकर, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्रभागा आटपाडकर यांनी या लढ्याला बळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक सदस्याचे दोन लाख असे वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला.यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले, माणमधील दीड हजार रुग्णांपैकी एक हजार कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. त्यांना वैद्यकीय सल्ल्याने फॅबी फ्ल्यू गोळ्या दिल्या तर लवकर बरे होतील.गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्या सल्ल्याने संबंधित रक्कम खर्च करण्याचे सुचित केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये फॅबि फ्ल्यू गोळ्यांसाठी, ५.५ लाख रुपये ऑक्सिजन कॉन्संट्रेटरसाठी, २ लाख रुपये जम्बो सिलेंडरसाठी तर १ लाख रुपये जनजागृतीसाठी वापरण्याचे निश्चित केले. उर्वरित रक्कमही आवश्यक असेल तशी वापरण्याचा निर्णय घेतला.प्रशासन जनतेसोबत कायममाणची जनता कोरोनाच्या भयंकर संकटात सापडली आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या विशेषत: आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात माण पंचायत समिती जनतेसोबत खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही प्रभारी सभापती तानाजी कट्टे-पाटील यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर