वारुंजीत इमारतीसाठी पंचवीस लाख निधी मंजूर : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST2021-07-15T04:27:01+5:302021-07-15T04:27:01+5:30

मलकापूर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून वारूंजी (ता. कऱ्हाड) येथे ग्रामसचिवालय व चावडीच्या नवीन इमारतीसाठी पंचवीस लाखांचा ...

Twenty five lakh funds sanctioned for Varunjit building: Patil | वारुंजीत इमारतीसाठी पंचवीस लाख निधी मंजूर : पाटील

वारुंजीत इमारतीसाठी पंचवीस लाख निधी मंजूर : पाटील

मलकापूर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून वारूंजी (ता. कऱ्हाड) येथे ग्रामसचिवालय व चावडीच्या नवीन इमारतीसाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, वारुंजी येथील ग्रामसचिवालय व चावडीच्या नूतन इमारतीसाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू होता. ग्रामविकास विभागातील हा निधी मंजूर करण्यासाठी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी प्रयत्न केले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून गावातील ग्रामसचिवालय व चावडीच्या नवीन इमारतीसाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या नवीन गावठाण तसेच ग्रामसचिवालय व चावडीच्या नूतन इमारतीमुळे वारुंजीच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या नवीन इमारतीतून ग्रामस्थांना उत्तमरित्या सेवा पुरवता येतील. वारुंजीच्या ग्रामसचिवालय व चावडीच्या निधीसाठी राहुल पवार, महेश पाटील, संभाजी चव्हाण, अशोक पाटील, जितेंद्र पाटील, इम्तियाज नदाफ, संतोष चव्हाण, सोहेल नदाफ, दीपक भंडलकर, आबासाहेब भोसले व सुनील लगडे यांनी वारंवार पाठपुरावा केला.

Web Title: Twenty five lakh funds sanctioned for Varunjit building: Patil