शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

Satara: स्तनपान करताना उलटी झाली, फुप्फुसात अडकल्याने चिमुकली दगावली; कऱ्हाड येथील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:23 IST

कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का

सातारा : तळबीड, ता. कऱ्हाड येथून एक दुर्दैवी घटना समोर आली असून, एका २० दिवसांच्या चिमुकलीच्या फुप्फुसात उलटी अडकल्याने यातच तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी, (दि. ६) घडली.वेदिका संताजी कांबळे (वय २० दिवस, मूळ रा. कोडोली पारगाव, ता. हातकणंगले, कोल्हापूर, सध्या रा. भुईगल्ली, तळबीड, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत तळबीड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेदिका हिला तिची आई अंकिता ही स्तनपान करीत होती. त्यावेळी चिमुकलीला उलटी झाली. तिला त्रास होऊ लागल्याने कऱ्हाड येथील काॅटेज हाॅस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. आपल्या तान्ह्या मुलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. रुग्णालयासमोर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या दुर्दैवी घटनेची काॅटेज हाॅस्पिटलचे डाॅ. तुषार नाळे यांनी तळबीड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आईने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यकबाळाच्या फुप्फुसांमध्ये उलटी अडकली जाऊ नये, यासाठी आईने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला दूध पाजल्यानंतर त्याला काही वेळ सरळ स्थितीत ठेवावे, तसेच त्याला थोडेसे उंच उशीवर किंवा आपल्या मांडीवर ठेवून पाठीवरून थोपटल्यास उलटी होण्याची शक्यता कमी होते. दूध पाजल्यानंतर बाळाचा ढेकर काढणे गरजेचे असते. -अरुंधती कदम, बालरोगतज्ज्ञ, सातारा