आरोग्य केंद्रासाठी बारा वर्ष लढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST2021-08-17T04:44:24+5:302021-08-17T04:44:24+5:30

पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना वाहनाअभावी डोंगरकपारीतून पायी प्रवास करावा लागत आहे. शासनाने आरोग्याच्या सुविधा सर्वत्र उपलब्ध करून दिल्या असल्या तरी ...

Twelve years fight for health center! | आरोग्य केंद्रासाठी बारा वर्ष लढा!

आरोग्य केंद्रासाठी बारा वर्ष लढा!

पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना वाहनाअभावी डोंगरकपारीतून पायी प्रवास करावा लागत आहे. शासनाने आरोग्याच्या सुविधा सर्वत्र उपलब्ध करून दिल्या असल्या तरी या पठारावरील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न अजूनही तसाच प्रलंबित आहे. कसणी येथील ग्रामस्थांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीबाबतचा प्रस्ताव तयार केला, तसेच त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली. त्यावेळी प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर चौकशीसाठी आरोग्य विभागाकडे आला. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ग्रामपंचायतीने जागाही घेतली आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य केंद्राचा प्रस्ताव अजूनही धूळ खात पडला आहे.

- चौकट

... या गावांना होणार फायदा!

निवी, कसणी, बौद्ध वस्ती, चोरगेवाडी, सतीचीवाडी, मस्करवाडी, निनाईचीवाडी, कसणी, धनगरवाडा, नवीवाडी, विनोबाचीवाडी, वरचे घोटील, निगडे, धनावडेवाडी, काळगाव, धनगरवाडा, माईंगडेवाडी, सातर, महाळुंगडेवाडी, गणेशवाडी आदी गावांतील लोकांना कसणी येथे उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेता येणार आहेत.

Web Title: Twelve years fight for health center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.