शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक: मंदिरातच बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 16:45 IST

संशयित आरोपी तरुणाच्या वडिलानेही मुलीला ‘तू माझ्या मुलासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्या वडिलांना व तुझ्या घरातील लोकांना मारून टाकीन,’ अशी धमकी दिली.

सातारा : एका मंदिरातच बारा वर्षाच्या मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खंडाळा तालुक्यातील एका गावात उघडकीस आली असून, ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील एका गावातील बारा वर्षांची मुलगी ९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दुकानात जात होती. त्यावेळी त्याच गावातील एका तरुणाने तिला बोलावून घेतले. मुलीला धमकी देऊन जवळच असलेल्या मंदिरात नेले. त्यानंतर तिच्यावर त्याने जबरदस्तीने अत्याचार केला. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला मारून टाकीन. तसेच तुझ्या घरच्यांना पण मारून टाकीन, अशी धमकी त्या तरुणाने दिली. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार भीतीपोटी कोणालाही सांगितला नाही.ही घटना घडली त्याच दिवशी संशयित आरोपी तरुणाच्या वडिलानेही मुलीला ‘तू माझ्या मुलासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्या वडिलांना व तुझ्या घरातील लोकांना मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी तिच्या मामीकडे गेली होती. त्यावेळी तिने हा सारा प्रकार मामीला सांगितला.त्यानंतर मामीने फोनवरून मुलीच्या आईला या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या आईने तातडीने लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी संबंधित तरुणावर अत्याचार केल्याचा तर त्याच्या वडिलांवर धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. दोघेही बापलेक पोलिसांना सापडले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी