वाकी येथे बारा ब्रास वाळू साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST2021-09-13T04:39:05+5:302021-09-13T04:39:05+5:30
म्हसवड : तालुक्यातील वाकी-वरकुटे येथे माण नदीपात्रातील वाळू चोरी करून साठा केलेला ७२ हजार किमतीचा बारा ब्रास वाळू साठा ...

वाकी येथे बारा ब्रास वाळू साठा जप्त
म्हसवड : तालुक्यातील वाकी-वरकुटे येथे माण नदीपात्रातील वाळू चोरी करून साठा केलेला ७२ हजार किमतीचा बारा ब्रास वाळू साठा प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी जप्त केला. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकी-वरकुटे येथील माण नदीच्या पात्राजवळील ठेंगील वस्ती परिसरातील गट नंबर १५८ मधील पडीक क्षेत्रात माण नदीपात्रातील वाळू उपसा करून तो विक्रीसाठी साठा करून ठेवला होता. याची माहिती प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना मिळताच संबंधित स्थळी गौणखनिज व वाळू भरारी पथकाने छापा टाकला. यामध्ये केलेला अवैधरीत्या साठा जप्त केला. ही वाळू म्हसवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. माण नदीपात्रातील वाळू चोरीच्या प्रकारावर नियंत्रण राखण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने नदीपात्रात टेहळणी केली जात आहे.