शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

विद्यार्थ्यांच्या बाजारपेठेत ५० हजारांची उलाढाल : शेरेचीवाडीतील शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:00 IST

फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (हिंग) शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कच्या मालापासून दिवाळीसाठी लागणाºया वस्तू बनवून शाळेच्या बाजारात विक्रीस ठेवून ठेवण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देकच्च्या मालापासून दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू विक्रीस; वेगळा उपक्रम यशस्वी एवढ्या लहान वयात मुलांना यानिमित्ताने व्यवहाराचे ज्ञान

आदर्की : फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (हिंग) शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कच्या मालापासून दिवाळीसाठी लागणाºया वस्तू बनवून शाळेच्या बाजारात विक्रीस ठेवून ठेवण्यात आल्या होत्या. या मुलांनी भरविलेल्या बाजारपेठेत सुमारे ५० हजारांची विक्री झाली. एवढ्या लहान वयात मुलांना यानिमित्ताने व्यवहाराचे ज्ञान घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फलटण तालुक्यातील शेरेची वाडी (हिंग) शाळेतील शिक्षकांनी पुणे येथून पणत्या बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करून शाळेतील ८० विद्यार्थ्यांना दिला.या विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक संजय शिंदे, सुनील बोडके, सचिन गुरव यांनी आठ दिवस प्रशिक्षण देऊन रंगीबेरंगी आकर्षक पणत्या मुलांकडून बनवून घेतल्या. शनिवारी शालेय विद्यार्थ्यांनी बाजार भरवून त्यामध्ये भाजीपाला, अन्नधान्याबरोबर पणत्याही विक्रीसाठी ठेवल्या होत्या. पणत्या व भाजीपाला यातून पन्नास हजार रुपयांची विक्री झाली. शालेय बाजाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती प्रतिभा धुमाळ, सरपंच शामराव कणसे, पोलीस पाटील प्रथमेश सूर्यवंशी, शिवाजी घाडगे, दादासाहेब गोपनर, अप्पासाहेब नलवडे केंद्रप्रमुख रणवरे, अर्जुन भोईटे, इलाई आतार, उत्तम निंबाळकर, शिवाजीबोडके, रमेश जाधव आदी शिक्षक, ग्रामस्थ, माहिला, विद्यार्थी उपस्थित होते.शेरेचीवाडीचा उपक्रम प्रेरणादायीस्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा मागे राहू नयेत, यासाठी सातारा जिल्हा परिषद शाळेसाठी भौतिक सुविधा त्याबरोबर बॅच, डिजिटल क्लासरूम, शैक्षणिक, साहित्य, आनंद मेळावे आयोजित करत आहेत. शेरेचीवाडी शाळेचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे दत्ता अनपट यांनी यावेळी सांगितले. असेच उपक्रम सुरु ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

विद्यार्थ्यांनी देवाण-घेवाणीचे ज्ञान यावे, आपण बनविलेल्या वस्तूची विक्री कशी करावी, यासाठी शालेय आठवडा बाजार भरवला. त्याला ग्रामस्थ, महिलांनी प्रतिसाद दिल्याने ५० हजारांची विक्री झाली.- संजय शिंदे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शेरेचीवाडी

टॅग्स :Studentविद्यार्थीSatara areaसातारा परिसर