एसटीवरच्या जाहिराती उतरवल्या

By Admin | Updated: September 16, 2014 23:27 IST2014-09-16T22:30:11+5:302014-09-16T23:27:23+5:30

आचारसंहिता : जबाबदारी एकाची; काम दुसऱ्याचे

Turned ads on ST | एसटीवरच्या जाहिराती उतरवल्या

एसटीवरच्या जाहिराती उतरवल्या

जगदीश कोष्टी - सातारा -निवडणुकीची आचरसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एसटी गाड्यांवरील शासनाच्या जाहिराती काढल्या आहेत.
विधानसभेसाठी १५ आॅक्टोबरला मतदान आहे. शुक्रवारपासून (दि. १२) आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने साधारणत: पंधरा दिवसांपूर्वीच सर्व विभागांना आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे पत्र दिले आहे.
दररोज लाखो लोकांचा दळणवळणाचा प्रश्न सोडविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाकडे हजारो गाड्या लोकांच्या सेवेत कार्यरत आहेत. या गाड्या महाबळेश्वर, जावळीसह पाटण तालुक्यातील दुर्गम, डोंगरी भागांबरोबरच अनेक गावांमध्ये धावतात. एसटीच्या जनसंपर्काचा फायदा घेण्यासाठी खासगी कंपन्यांबरोबर शासनानेही विविध योजनांची माहिती देणारे जाहिरात फलक एसटीवर लावले होते. सर्वसामान्यांना शासनांच्या योजनांची माहिती व्हावी, योजनांपासून कोणीही वंचित राहू नये, हा या जाहिरातीचा हेतू असला तरी एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना केलेल्या कामाचा प्रचारच होत होता.
आचारसंहितेच्या काळात फलक तसेच राहिले तर आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे एसटीच्या सातारा विभागाने जाहिरात लावण्याचा ठेका असलेल्या संबंधित कंपनीला हे फलक काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. तरी बरेच दिवस फलक तसेच होते.

Web Title: Turned ads on ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.