शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे पाणी शेतात वळवू

By admin | Updated: August 9, 2015 21:02 IST

भारत पाटणकर यांचा इशारा : वांग-मराठवाडीवर क्रांतिदिनी श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन

सणबूर : ‘जिल्ह्यातील सर्व धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने येत्या हिवाळी अर्थसंकल्पामध्ये वीस हजार कोटींची तरतूद करावी, अन्यथा सर्व धरणांतील पाणी सोडून जमिनी ताब्यात घेऊन सामूहिक शेती केली जाईल,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. वांग-मराठवाडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अशोक पाटील, वसंत मोहिते, श्रीरंग पाटील, उत्तम पवार, पोपट लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पाटणकर म्हणाले, ‘गेली अनेक वर्षं धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम अपूर्ण आहे. विशेषत: १९७६ पूर्वीच्या आणि १९९९६-९७ या काळात झालेल्या कोयना, वारणा, धोम, कण्हेर, वांग-मराठवाडी, उजनी यासह इतर धरणांतील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाची कामे निधीअभावी ठप्प झाली आहेत.शासनाने एकीकडे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या आणि धरणे बांधली. त्या धरणाच्या पाण्यात गावे आणि शेती बुडाली त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पुनर्वसन बाजूला ठेवून शासनाने जलयुक्त शिवायोजनेची घोषणा केली. या योजनेवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. आमचा विरोध जलयुक्त शिवाराला नाही. परंतु ते बांधलेले बंधारे भरण्यासाठी लागणारा साडेतीनशे ते पाचशे मिलीमीटर पाऊस हा दुष्काळी भागात पडत नाही. मग या बंधाऱ्यांत पाणी सोडणार कसे? यासाठी जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये धरणे बांधली. परंतु शासनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे कोयनेपासून वारणेपर्यंत आणि उरमोडीपासून तारळी पर्यंतचे पाणी काही प्रमाणात सूर्याच्या उष्णेतेने वाया जात आहे, तर उरलेले कर्नाटकात जात आहे आणि दुष्काळी भागांना मात्र टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ही एक प्रकारची सामाजिक गुन्हेगारी आहे. ती यापुढे खपवून घेणार नाही. असा इशारा भारत पाटणकर यांनी दिला. ते म्हणाले, शासनाने येत्या हिवाळी अधिवेशनात वीस हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवावे. शिवाय उरलेले पुनर्वसन तातडीने करावे, अन्यथा आम्ही पुकारलेला एल्गार थांबवणार नाही.’ यावेळी शेकडो धरणग्रस्त उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. जगन्नाथ विभुते यांनी आभार मानले. (वार्ताहर) ...पण शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही!५५ वर्षांपासून कोणतेही पुनर्वसन झालेले नाही आणि शासन म्हणतंय पैसे नाहीत. तुम्हाला चिक्की खायला पैसे आहेत. पूर्वीच्या सरकारमध्ये सिंचन घोटाळ्यात खायला अजित पवार, सुनील तटकरे यांना पैसा होता. भुजबळांना भानगडी करायला पैसा होता; पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत,’ असा आरोप डॉ. पाटणकर यांनी यावेळी केला....अन्यथा सर्वांना बरोबर घेऊन आंदोलन !शेतकऱ्यांना पैसे दिले तर आत्महत्या थांबतील, आम्ही अनेक चांगल्या मुद्द्यांचा आराखडा सरकारला पाठवला आहे. पण, हे सरकार यावर चर्चा करायलाच तयार नाही. पण यापुढे तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर जानेवारी अखेर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना, शेतमजुरांना प्रकल्पग्रस्तांना घेऊन आंदोलन सुरू करू, असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.