शिवथर परिसरात हळद काढण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:16+5:302021-02-08T04:34:16+5:30

शिवथर : शिवथर व परिसरात हळद काढण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे. या भागातील शेतकरी पाला कापणे तसेच हळद ...

Turmeric extraction in Shivthar area is almost done | शिवथर परिसरात हळद काढण्याची लगबग

शिवथर परिसरात हळद काढण्याची लगबग

शिवथर : शिवथर व परिसरात हळद काढण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे. या भागातील शेतकरी पाला कापणे तसेच हळद खांदणी यासारख्या हळदीच्या कामाला सुरुवात करत असतात.

शिवथर, आरफळ, मालगाव, गोवे या भागात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. मुबलक पाणी व शेणखत उपलब्ध असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर मेच्या शेवटच्या आठवड्यात ते जूनदरम्यान हळदची लागवड केली जाते. नऊ महिन्यांनंतर संक्रांतीच्या मुहूर्तावर हळद काढण्याला सुरुवात केली जाते. एकरी सरासरी १० ते १२ क्विंटलला उतारा येत असल्याने शेतकरी समाधानी आहे. सध्या शिवारामध्ये सगळीकडे हळदीचे ढीग दिसून येत आहे. मजुरांची वानवा असली तरी या भागात मजुरांच्या टोळ्या उपलब्ध आहेत. हळद काढणीस मजूर एकरी पंधरा हजार एवढी मजुरी घेत असून, हळद लागणीपासून काढणीपर्यंत व बाजारात विक्रीसाठी जाईपर्यंत शेतकऱ्याला खर्च येत आहे.

चौकट..

यावर्षी पडलेल्या अवेळी पावसामुळे हळदीचे उत्पन्न घटले आहे. हळदीचे उत्पन्न समाधानकारक असले तरी सध्याचा असलेला दर जर असाच राहिला तर शेतकऱ्यांनी केलेला खतपाणी, मजुरी व औषधांवरील खर्चसुद्धा हात येणे अवघड आहे.

फोटो आहे...

०७शिवथर

शिवथर व परिसरात हळद काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

Web Title: Turmeric extraction in Shivthar area is almost done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.