शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी सोडून फुलविली स्ट्रॉबेरी शेती!, साताऱ्यातील 'त्या' शेतकऱ्याला दिवसाआड पाच-सहा हजारचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 15:50 IST

सहा गुंठ्यात साठ हजार खर्च करून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न

सागर चव्हाणपेट्री : कास पठार परिसरातील चिकणवाडी, कुसुंबी (ता. जावळी) येथील तुकाराम चिकणे यांनी खासगी पवन चक्की ऑपरेटर नोकरी सोडून सहा गुंठ्यात पाच हजार रोपांची स्ट्रॉबेरीची शेती फुलविली. नवनवीन यशस्वी प्रयोगातून स्ट्रॉबेरी फळाचे भरघोस उत्पादन प्राप्त होऊन परिसरातील बाजारपेठेसह पुणे, मुंबईत विक्री करत दिवसाआड पाच सहा हजार रुपयांचा फायदा होत आहे.नोकरी नको एखादा व्यवसाय बरा, नोकरी सोडून आपल्याला काहीतरी करायचं आहे. असे विचार अनेकांना भांबावून सोडतात. सगळे ठीक आहे अनेकजण असा विचार करतात. मात्र जेव्हा नोकरी सोडायचा विचार येतो त्यावेळी मात्र ते दोन पावलं मागे येतात. अनेकांना त्यांचा संसार असतो. पाठीमागे त्यांचा प्रपंच असतो. आता नोकरी सोडून काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचं म्हटलं अन् त्यात अपयश आल्यावर कुटुंबाचे काय? आपल्या भविष्याच काय ? असा विचार सुद्धा बरोबर आहे. पण थोडा हा धाडसाचा प्रश्न आहे. ज्यांना आपल्या कामावर विश्वास आहे. ते असे निर्णय घेऊन यशस्वी देखील होतात.अगदी याचप्रमाणे तुकाराम चिकणे या ध्येयवेड्या शेतकऱ्याने नोकरी नाकारून आपले नवे अस्तित्व निर्माण केले. यशामागे त्यांना साथ होती त्यांच्या पत्नीची. त्यांचा प्रेरणादायी प्रयोग नवी ऊर्जा निर्माण करणारा असून वायरमनची नोकरी सोडून शेतीत नवनवीन यशस्वी प्रयोग केले. एवढेच नव्हे तर त्यातून केलेली कमाई देखील वाखाणण्याजोगी आहे. सहा गुंठ्यात साठ हजार खर्च करून दोन लाखांचे उत्पन्न मिळविण्यात यश आले.सहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली. डोंगरमाथ्यावरील वातावरणात लागवड करून यशस्वी उत्पादन घेत आहेत. शेतीची मशागत करून शेणखत, जीवांमृत वापरले. चार फुटांवर बेड तयार केले. कीटकनाशक, औषध फवारणी, ठिबक सिंचनाचा वापर केला. रोपांची लागवड केल्यानंतर ३० दिवसांनी फुले येऊन ५५ दिवसात फळास सुरुवात झाली. दहाव्या दिवशी फळ परिपक्व होऊ लागले.

लाल चुटूक रंग अन् चवीला गोडवाफळांचा रंग गडद लाल असून मोठ्या फळांचे वजन दीडशे ग्रॅम पर्यंत आहे. झाडाला पिकल्याने गोडवा जास्त असून शंभर रूपयांना एक बॉक्स प्रमाणे आसपासच्या जिल्ह्यात तसेच मुंबई, पुण्यात विक्री होत असल्याचे समाधान मिळत आहे. भिलार मधील नारायण ढेबे मित्राकडून मार्गदर्शन मिळाले.

जैविक तसेच कीटकनाशक औषध फवारणी केली. ३५ दिवसांत फ्लॉवरींगमुळे उत्साह निर्माण होऊन माझ्यासाठी नवीन पीक होते. ६५ दिवसानंतर फळ येण्यास सुरुवात झाल्यानंतर आनंद निर्माण होऊन यशस्वी प्रयोगाचा अभिमान वाटतो. भविष्यात चांगला फायदा होईल. - तुकाराम चिकणे,

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी