शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

..अन् ट्रॅक्टर घुसला थेट घरात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; साताऱ्यातील विडणीजवळ झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 12:51 IST

आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील अब्दागिरेवाडी जवळ आज, बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

सतिश कर्वेकोळकी : दोन ट्रॅक्टरची समोरा-समोर होणारी धडक चुकवण्याच्या प्रयत्नात महामार्गालगत असलेल्या घरातच एक ट्रॅक्टर भिंत तोडून घुसला. या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. सुदैवाने घरातील लोक घराबाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली. आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील अब्दागिरेवाडी जवळ आज, बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, फलटणहून पिंपरदकडे एक ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर निघाला होता. तर माळशिरसहून फलटणकडे खत वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर (एम.एच-१३-ए.जे.-५३२४) भरधाव वेगात निघाला होता. विडणी हद्दीतील अब्दागिरेवाडीजवळ या दोन ट्रॅक्टरची समोरा समोर धडक होत होती.ही धडक चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत असलेल्या घरात एक ट्रॅक्टर घुसला. यात चालक गंभीर जखमी झाला. तर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी ट्रक चालकास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.अपघाताची माहिती विडणीच्या पोलिस पाटील शितल नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलिसांना दिली. यानंतर तत्काळ फलटण ग्रामीणचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात