भरोसा सेलने बालविवाह रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST2021-06-28T04:26:40+5:302021-06-28T04:26:40+5:30

सातारा: कोरेगाव तालुक्यातील शाहूनगर येथील बेघर वस्तीतील एका अल्पवयीन मुलीचा विवाह भरोसा सेलच्या पथकाने रोखला. हा प्रकार शुक्रवार, दि. ...

The trust cell prevented child marriage | भरोसा सेलने बालविवाह रोखला

भरोसा सेलने बालविवाह रोखला

सातारा: कोरेगाव तालुक्यातील शाहूनगर येथील बेघर वस्तीतील एका अल्पवयीन मुलीचा विवाह भरोसा सेलच्या पथकाने रोखला. हा प्रकार शुक्रवार, दि. २५ रोजी उघडकीस आला. याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील शाहूनगर येथील बेघर वस्तीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विवाह सातारा येथील शुभम सुरेश गायकवाड या २५ वर्षीय युवकासोबत होणार असल्याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा केल्यानंतर भरोसा सेलचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी या पथकाने हा बालविवाह रोखला. यानंतर मुलीच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून त्यांना योग्य ती समज देण्यात आली असल्याची माहिती भरोसा सेलमधून देण्यात आली. बालविवाह रोखण्यात सहायक पोलीस निरीक्षक अनिता मेनकर, पोलीस हवालदार नंदकुमार चव्हाण, परशुराम वाघमारे, तृप्ती मोहिते यांनी सहभाग घेतला.

Web Title: The trust cell prevented child marriage