आग लागल्याने ट्रक चालक बचावला!

By Admin | Updated: March 8, 2017 18:38 IST2017-03-08T18:38:59+5:302017-03-08T18:38:59+5:30

ट्रक पूर्णपणे जळून खाक, उडी मारल्याने ट्रक चालकाचा जीव वाचला

Truck driver fired after fire! | आग लागल्याने ट्रक चालक बचावला!

आग लागल्याने ट्रक चालक बचावला!

आग लागल्याने ट्रक चालक बचावला!

लोकमत आॅनलाईनसाठी
कऱ्हाड/सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील कृष्णा पुलावर अचानक बुधवारी सायंकाळी ट्रकला भीषण आग लागल्याने ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. मात्र, प्रसंगावधान राखून ट्रक चालकाने स्टेरिंगवरून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.
साताराहून ट्रक कोल्हापूरकडे निघाला होता. यावेळी ट्रकमध्ये केवळ चालकच होता. कृष्णा पुलावर आल्यानंतर अचानक ट्रकने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवून पटकन उडी मारली. त्यानंतर काही क्षणातच ट्रकने संपूर्ण पेट घेतला. काही नागरिकांनी अग्निशमक दलाला बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. या आगीत ट्रकचा अक्षरश: कोळसा झाला. माल खाली करून ट्रक निघाला होता. त्यामुळे मोठे नुकसान टळले. (प्रतिनिधी)

Web Title: Truck driver fired after fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.