बोपेगावच्या उड्डाणपुलावरून ट्रक कोसळला
By Admin | Updated: April 12, 2017 23:50 IST2017-04-12T23:50:11+5:302017-04-12T23:50:11+5:30
जीवितहानी टळली; ट्रकसह साहित्याचे नुकसान

बोपेगावच्या उड्डाणपुलावरून ट्रक कोसळला
कवठे : बोपेगाव (ता. वाई) येथील नवीन झालेल्या उड्डाणपुलावरून सुमारे तीस फूट खोल ट्रक कोसळला. यामध्ये सुदैवाने चालकाचा जीव वाचला असून, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
पुण्याहून साताऱ्याकडे येणारा ट्रक बुधवारी सकाळी हा बोपेगाव येथील उड्डाणपुलाच्या मधोमध आला. अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने संरक्षण कठडा तोडून सुमारे तीस फूट खोलीवर उड्डाणपुलाच्या तळाशी असलेल्या भिंतीवर जाऊन कोसळला. त्यानंतर ट्रक पलटी झाला. ट्रकची पुढची दोन्हीही चाके धडीपासून तुटून वेगळी झाली. ट्रक पलटी झाल्याने ट्रकमध्ये असलेले साहित्य हा ट्रकखाली दबले गेले. या ठिकाणावरील दोन्ही पुलांमधील अंतर हे अपघाताच्यादृष्टीने धोकादायक असून, तीन ते चार फूट संरक्षण कठडा तकलादू असल्याने तो तोडून हा अपघात झाला, असे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)