टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रॉली-ट्रकचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:27+5:302021-08-29T04:37:27+5:30
मलकापूर : टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रॉली-ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. पुणे-बंगलोर आशियाई ...

टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रॉली-ट्रकचा अपघात
मलकापूर : टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रॉली-ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर येथील सागर हॉटेलजवळ शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्यासुमारास हा अपघात झाला. या अपघातात वाहनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बिष्णो भोपाल (वय ४५, रामनगर, जोधपूर, राजस्थान) असे अपघातातील गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक बिष्णो भोपाल हे माल भरलेला ट्रॉली ट्रक (आरजे १९ जीई ८११५) हा पुण्याकडून बंगलोरकडे निघाला होता. पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरून जात असताना येथील सागर हॉटेलजवळ आला असता, अचानक ट्रकचा पुढील टायर फुटल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने फलकाच्या बीमसह महामार्गाकडेच्या लोखंडी जाळीला धडक झाली. या अपघातात ट्रॉली-ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच या अपघातात चालक बिष्णो भोपाल यांच्या पायाला जबर मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, अशोक जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी व देखभाल विभागाचे कर्मचारी आणि कऱ्हाड शहर पोलीस स्टेशनचे खालील इनामदार व प्रशांत जाधव हे त्वरित अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. क्रेनच्या साह्याने गाडी काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
२८मलकापूर अपघात
अचानक टायर फुटल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने फलकाच्या बीमसह लोखंडी जाळीला धडक झाली. (छाया : माणिक डोंगरे)
280821\img-20210827-wa0074.jpg
फोटो कॕप्शन
अचानक टायर फुटल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने फलकाच्या बिमसह लोखंडी जाळीला धडक झाली. (छाया माणिक डोंगरे)