शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कराडात भाजपची तिरंगा बाईक रॅली, उदंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:56 IST

धैर्यशील कदम हे जयकुमार गोरे यांच्या गाडीतून पुढे निघून गेले. याचीही चर्चा रॅली संपल्यावर सुरू होती.

प्रमोद सुकरेकराड:  येथील भारतीय जनता पार्टी कराड शहर, दक्षिण, उत्तरच्यावतीने बुधवारी भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रिमांड होम पासून  हुतात्मा स्मारकात अभिवादन करून दत्त चौक मार्गे आझाद चौक, नेहरू चौक, कमानी मारुती, पांढरा मारुती, विजय चौक, दत्त चौक, मार्गे रॅली काढण्यात आली. कार्वे नाका येथे रॅलीचा समारोप झाला.रॅलीच्या अग्रभागी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेश सचिव डॉ. अतुल भोसले यांचा सहभाग होता. रॅलीत मुकुंद चरेगावकर अँड.भरत पाटील, रामकृष्ण वेताळ,सागर शिवदास, कराड दक्षिणचे अध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, उत्तरचे अध्यक्ष महेश  जाधव, शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.आमदार जयकुमार गोरे म्हणाले, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने 'हर घर तिरंगा' हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतला आहे. त्याचेच प्रबोधन व्हावे; ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांचा सन्मान व्हावा. ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे या हेतूने आज कराडमध्ये ही बाईक रॅली काढण्यात आली आहे. याला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा फडकवून यात सहभागी व्हावे.डॉ. अतुल भोसले म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी त्याग केला. त्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी 'हर घर तिरंगा' हे अभियान आहे. त्या त्यागातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, आपला देश बलशाली बनविण्याचा निर्धार करावा ही अपेक्षा आहे.धैर्यशील कदमांची चर्चा!कराड उत्तरचे युवक नेते, वर्धन ऍग्रोचे प्रमुख धैर्यशील कदम यांनीही या तिरंगा बाईक रॅलीच्या समारोपप्रसंगी हजेरी लावली. त्यानंतर धैर्यशील कदम हे जयकुमार गोरे यांच्या गाडीतून पुढे निघून गेले. याचीही चर्चा रॅली संपल्यावर सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBJPभाजपा