विलासकाकांना उद्या सातारकरांची श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:02 IST2021-01-08T06:02:45+5:302021-01-08T06:02:45+5:30

सातारा : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर (काका) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सातारकर नागरिकांच्यावतीने शुक्रवारी (दि. ८) ...

Tribute of Satarkars to Vilaskaka tomorrow | विलासकाकांना उद्या सातारकरांची श्रद्धांजली

विलासकाकांना उद्या सातारकरांची श्रद्धांजली

सातारा : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर (काका) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सातारकर नागरिकांच्यावतीने शुक्रवारी (दि. ८) रोजी साताऱ्यातील समर्थ सदन येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी यांनी दिली आहे.

गवळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विलासकाका आणि सातारा शहराचे चाळीस वर्षांपासूनचे विशेष जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. शहरातील विविध सहकारी संस्था, सामाजिक संस्था आणि विविध उपक्रमांशी ते जोडले गेले होते. शहरातील विविध क्षेत्रात आणि खास करून सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, उद्योजकता क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांच्याशी स्नेह होता. त्यांचे साताऱ्यातील मित्रवर्तुळ मोठे होते. त्यांच्या निधनाने या सर्वांना दु:ख झाले आहे. त्यांच्या सहवासातील असंख्य आठवणी अनेकांकडे अजूनही ताज्या आहेत. या सर्वांच्या भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त होणार आहेत.

समर्थ सदनात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या श्रद्धांजली सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

दरम्यान, सातारकर नागरिकांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन या सभेस सभेस यावे, असेही पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: Tribute of Satarkars to Vilaskaka tomorrow