महामार्गावर गाड्यांवर पडले झाड; वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST2021-04-05T04:35:45+5:302021-04-05T04:35:45+5:30

नागठाणे : परिसरात पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वळसे गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रप्रस्थच्या समोर एक भलेमोठे वडाचे झाड ...

Trees fell on carts on the highway; Traffic disrupted | महामार्गावर गाड्यांवर पडले झाड; वाहतूक विस्कळीत

महामार्गावर गाड्यांवर पडले झाड; वाहतूक विस्कळीत

नागठाणे : परिसरात पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वळसे गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रप्रस्थच्या समोर एक भलेमोठे वडाचे झाड दुचाकी आणि चारचाकी वाहनावर पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (दि. ४) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वळसे (ता. सातारा) गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रप्रस्थच्या समोर कराड बाजूने साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक भलेमोठे वडाचे झाड एका दुचाकी आणि चारचाकी गाडीवर पडल्यामुळे दुचाकीवरून (क्र. एमएच ०९ डीएल ३०२६) जाणाऱ्या दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या. शैलेश भोसले (वय ३५ ) व महेश भास्कर ( ३२ रा. रंकाळा, कोल्हापूर) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

चारचाकी (एम एच ५० एल ४५३२) गाडीमधील कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन इनचार्ज दस्तगीर आगा यांच्या टीमने तसेच महामार्ग वाहतूक केंद्र कराड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, सहाय्यक फौजदार राजू बागवान, पोलीस नाईक वैभव पुजारी, रुपेश कारंडे, रायसिंग घोरपडे, देवदत्त शेडगे, हायवे मृत्युंजय दूत, नागठाणे पिंटू सुतार, सोहेल सुतार आणि बोरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाजूला काढून सुमारे २ तास विस्कळीत झालेली सर्व वाहतूक सेवा रस्त्यावरून चालू केली. तदनंतर महाकाय असणाऱ्या वडाच्या झाडास रस्त्यावरून बाजूला काढण्यासाठी नागठाणे येथील क्रेन बोलविण्यात आली, त्याचबरोबर दोन कटर बोलावून महाकाय वटवृक्षाच्या फांद्या कापून संपूर्ण झाड क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढून संपूर्ण महामार्ग मोकळा करण्यास सुमारे तीन तासांचा कालावधी लागला.

Web Title: Trees fell on carts on the highway; Traffic disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.