वासोळे येथे युवक काँग्रेसच्यावतीने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:25 IST2021-06-29T04:25:43+5:302021-06-29T04:25:43+5:30

वाई : वाई तालुक्यातील पश्चिम भागातील मौजे वासोळे (ता. वाई) याठिकाणी युवक काँग्रेसच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा ...

Tree planting at Vasole on behalf of Youth Congress | वासोळे येथे युवक काँग्रेसच्यावतीने वृक्षारोपण

वासोळे येथे युवक काँग्रेसच्यावतीने वृक्षारोपण

वाई : वाई तालुक्यातील पश्चिम भागातील मौजे वासोळे (ता. वाई) याठिकाणी युवक काँग्रेसच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे, तालुकाध्यक्ष प्रमोद अनपट उपस्थित होते.

पश्चिम भागात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असून, वाईचा दुर्गम भाग असणाऱ्या पश्चिम भागात लोकांच्या असणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवक काँग्रेस प्रयत्न करत असून, कार्यकर्त्यांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे.

वृक्षारोपण कार्यक्रमाला सरपंच ज्ञानदेव कोंढाळकर यांच्यासह ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रमोद अनपट म्हणाले, ‘मंजूर करून आणलेली विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असून, त्यासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. लोकांपर्यंत पुन्हा काँग्रेस कशाप्रकारे पोहोचेल व राष्ट्रीय नेते राहुल गांधी, नानासाहेब पटोले व तालुक्यात विराज शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’

यावेळी आंबा, चिंच, आवळा अशा विविध प्रकारच्या फळझाडांचे व औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले.

Web Title: Tree planting at Vasole on behalf of Youth Congress