महाबळेश्वर पालिकेतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST2021-02-05T09:06:50+5:302021-02-05T09:06:50+5:30

महाबळेश्वर : माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महाबळेश्वर पालिकेतर्फे येथील माखरिया हायस्कूल प्रांगणात मुख्याधिकारी पल्लवी पाटील, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, अर्बन बॅंकेचे ...

Tree planting by Mahabaleshwar Municipality | महाबळेश्वर पालिकेतर्फे वृक्षारोपण

महाबळेश्वर पालिकेतर्फे वृक्षारोपण

महाबळेश्वर : माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महाबळेश्वर पालिकेतर्फे येथील माखरिया हायस्कूल प्रांगणात मुख्याधिकारी पल्लवी पाटील, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

महाबळेश्वर पालिकेच्या वतीने शहर व परिसरात जांभूळ, उंबर, डाका व सोनचाफा या प्रजातीच्या ८५०हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. महाबळेश्वर पालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील सेठ गंगाधर माखरिया हायस्कूल प्रांगणात माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्याधिकारी पल्लवी पाटील, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, अर्बन बँकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक युसूफभाई शेख, कुमार शिंदे, संदीप साळुंखे, रवींद्र कुंभारदरे, प्रकाश पाटील, नगरसेविका विमलताई पार्टे, विमल ओंबळे, श्रद्धा रोकडे, शारदा ढाणक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार वायदंडे, संचालक जावेद वलगे, बाळासाहेब कोंढाळकर, बाबूराव कात्रट, पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, वृक्षाधिकारी कल्याण हिवरे, मुख्याध्यापक दिलीप ढेबे उपस्थित होते.

Web Title: Tree planting by Mahabaleshwar Municipality