विजयनगरला चव्हाण विद्यालयात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST2021-07-12T04:24:18+5:302021-07-12T04:24:18+5:30

तांबवे : दिवंगत माजी खासदार आनंदराव चव्हाण व प्रेमिला काकी चव्हाण, तसेच दिवंगत रामचंद्र राघोजी पाटील यांच्या संयुक्त स्मृतिदिनानिमित्त ...

Tree planting at Chavan Vidyalaya, Vijayanagar | विजयनगरला चव्हाण विद्यालयात वृक्षारोपण

विजयनगरला चव्हाण विद्यालयात वृक्षारोपण

तांबवे : दिवंगत माजी खासदार आनंदराव चव्हाण व प्रेमिला काकी चव्हाण, तसेच दिवंगत रामचंद्र राघोजी पाटील यांच्या संयुक्त स्मृतिदिनानिमित्त विजयनगर, ता.कऱ्हाड येथील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून आदरांजली वाहण्यात आली.

माजी आमदार आनंदराव पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, प्रेमिला काकी माध्यमिक विद्यालयाचे सचिव प्रतापसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य विजयराव चव्हाण, आर.टी. स्वामी, सहायक वनरक्षक किरण कांबळे, सहायक वनरक्षक विलासराव काळे, अतिरिक्त वनक्षेत्रपाल अर्जुन गमरे, वनरक्षक अशोक मतब, रमेश कुंभार, सरपंच संजय शिलवंत, उपसरपंच विश्वासराव पाटील, ग्रामविकास अधिकारी ए.पी. आवळे उपस्थित होते.

माजी वनसंरक्षक किरण कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्ताने विद्यालय व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. विकास कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Tree planting at Chavan Vidyalaya, Vijayanagar