पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येलाच कऱ्हाडमध्ये वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:12+5:302021-06-05T04:28:12+5:30
कऱ्हाड: पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला कराड नगरपालिका हद्दीतील काही झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी प्रकट केली ...

पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येलाच कऱ्हाडमध्ये वृक्षतोड
कऱ्हाड: पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला कराड नगरपालिका हद्दीतील काही झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी प्रकट केली आहे. ''झाडे लावा, झाडे जगवा'' हा उपक्रम राबवत असतानाच जुन्या झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत असल्याच्या प्रतिक्रिया कऱ्हाड शहरात उमटू लागल्या आहेत.
कऱ्हाड नगरपालिका हद्दीतील कराड मार्केट यार्ड येथे नगरपालिकेच्या मालकीची कार्वे नाका रस्त्यालगत पेठ शनिवार साईट क्रमांक ५४ येथे ट्रान्सपोर्ट सेंटर आहे. या ठिकाणी यापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. सदरची झाडे मोठी झाली असताना त्याची तोड केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे याचे प्रत्यंतर येत आहे. ऑक्सिजनबाबत जनजागृती करताना ''झाडे लावा झाडे जगवा'' हा संदेश अनुभवत असतानाच झाडांची तोड होणे हे दुर्दैवी आहे. ५ जून रोजी पर्यावरण दिन आहे. दरम्यान, पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे चार जून रोजी वृक्षतोड करण्याचे काम कराडमध्ये सुरू आहे.
(चौकट )
मिलिटरी हॉस्पिटलला ट्रान्सपोर्ट सेंटरमधील गाळे देण्यात आले आहेत. त्यांनी नगरपालिकेला विनंती केल्यानुसार धोकादायक तीन झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, इतर झाडांच्या फांद्या तोडण्याचीही परवानगी दिली असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले.
फोटो :