आदर्की बुद्रुक येथील वृक्ष ठरताय अपघातास निमंत्रण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:17+5:302021-02-09T04:41:17+5:30

आदर्की : सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की बुद्रुक येथील रस्त्याला व वाहनाला अडथळा ठरत असलेले जुने वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व ...

The tree at Adarki Budruk invites accidents! | आदर्की बुद्रुक येथील वृक्ष ठरताय अपघातास निमंत्रण!

आदर्की बुद्रुक येथील वृक्ष ठरताय अपघातास निमंत्रण!

आदर्की : सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की बुद्रुक येथील रस्त्याला व वाहनाला अडथळा ठरत असलेले जुने वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.

सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की फाटा ते फलटणदरम्यान संस्थानकाळात आंबा, चिंच, वड, पिंपरण आदी वृक्षांची लागवड केली होती. ही झाडे आता जुनी व धोकादायक झाली आहे, अशी धोकादायक झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदार काढतात; पण ठेकेदार फायद्याची ठरणारी झाडे काढतात. लिंबाची झाडे व फांद्या काढल्या आहेत. आदर्की बुद्रुक येथे पिंपरण व वडाची अशी दोन वृक्ष धोकादायक स्थितीत आहेत. वडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने उंच ट्रक व उसाच्या ट्रॉली फांदीला धडकतात तर एकावेळी दोन वाहने झाडाखाली आल्यास वाहनास फांद्या धडकतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठा अपघात होण्याअगोदर संबंधित विभागाने धोकादायक वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.

०८आदर्की

फोटो : आदर्की बुद्रुक रस्त्यावर पिंपरणी वृक्ष अपघातास निमंत्रण देत आहे.

Web Title: The tree at Adarki Budruk invites accidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.