महामार्गावर प्रवासी

By Admin | Updated: November 28, 2014 00:14 IST2014-11-27T21:27:33+5:302014-11-28T00:14:28+5:30

पाहताहेत मृत्यूची वाट बसस्थानक रिकामे : महामार्गावर गर्दी!

Travelers on the highway | महामार्गावर प्रवासी

महामार्गावर प्रवासी

अजय जाधव - उंब्रज पुणे-बंगळूर महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील बाजारपेठ असलेले मोक्याचे गाव म्हणजे उंब्रज. महामार्गालगतचे गाव; मात्र तरीही मसूर, चाफळ, तारळे या तीनही भागांतील लोकांच्या संपर्काचे गाव. तरीही येथील बसस्थानक मात्र कायम रिकामेच दिसून येते.
महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत येथे भराव पूल झाला. एसटी गाड्या उपमार्गावरून खाली येऊन बसस्थानकात येण्याच्या बंद झाल्या. कर्नाटक राज्यातील बसेस पासून मुंबई आगारातील एसटी गाड्या या उंब्रजला हमखास थांबतातच. आजही थांबतात; परंतु आता महामार्गावर थांबत आहेत. महामार्गावरच एसटीचा बेकायदा थांबे झाले आहेत. एसटी गाड्या बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहेत. भराव पुलावर जाताना अनेक वयस्कर व महिला प्रवाशांना सर्कस करावी लागते. तसेच बसस्थानकात एसटी बसेस येत नसल्यामुळे या परिसरातील व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे. तसेच प्रवाशांनाही महामार्गावर बसेस थांबत असल्याने स्वच्छतागृहात जाता येत नाही. गैरसोय निर्माण झाली आहे.
पारगाव खंडाळा अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. याचा फायदा उंब्रजकरांनी उठविणे गरजेचे आहे. तापलेल्या तव्यावर पोळी लगेच भाजते, तसे एसटी बसस्थानकात येण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे बनले असून, यासाठी उंब्रज पोलिसांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत व व्यापारी यांची बैठक घेऊन सकारात्मक पाऊल टाकावे, अशी मागणी होत आहे.


बसस्थानक
कोमात : १

Web Title: Travelers on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.