वडगाव हवेलीची यात्रा साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:38+5:302021-02-05T09:14:38+5:30
प्रतिवर्षी हजारो भाविक या यात्रेसाठी उपस्थित असतात. मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या अनुषंगाने प्रशासनाने घातलेल्या कडक निर्बंधामुळे सर्वच यात्रा, ...

वडगाव हवेलीची यात्रा साधेपणाने
प्रतिवर्षी हजारो भाविक या यात्रेसाठी उपस्थित असतात. मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या अनुषंगाने प्रशासनाने घातलेल्या कडक निर्बंधामुळे सर्वच यात्रा, उत्सव रद्द करण्यात आले. वडगावची यात्राही यंदा रद्द करण्यात आली. यात्रेमध्ये गर्दी न करण्याबाबत प्रशासनाने निर्बंध घातल्याने पालखी, सासनकाठ्या वगळता रथाचे मानकरी भाविकांच्या घराजवळच पूजन करण्यात आले. यात्रेच्या मुख्य दिवशी सामाजिक अंतर ठेवून देवांच्या मूर्तींची मोजक्या मानकऱ्यांसह मंदिरापासून पालखी काढण्यात आली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मिरवणूक मंडपात आली. देवाच्या बोहल्यावर पारंपरिक पद्धतीने उपस्थित भाविकांच्या साक्षीने खंडोबा-म्हाळसा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर सायंकाळी सुतार मानकरी यांच्याकडून देवाचा लंगर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी पालखीची गावामधून मिरवणूक काढण्यात आली. शासकीय नियमांचे पालन करीत यात्रा उत्साहात पार पडली.