खड्ड्याच्या रस्त्यातून प्रवास सुखाचा होवो, कºहाड स्वाभिमानीचे आंदोलन ; चालकांना गुलाबपुष्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:24 IST2017-12-15T22:22:07+5:302017-12-15T22:24:58+5:30
कºहाड : रस्त्यावरील खड्ड्यातून जाताना आपला प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रवाशांना गुलाबपुष्प देण्याचे अनोखे आंदोलन शुक्रवारी कºहाड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केले.

खड्ड्याच्या रस्त्यातून प्रवास सुखाचा होवो, कºहाड स्वाभिमानीचे आंदोलन ; चालकांना गुलाबपुष्प
कºहाड : रस्त्यावरील खड्ड्यातून जाताना आपला प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रवाशांना गुलाबपुष्प देण्याचे अनोखे आंदोलन शुक्रवारी कºहाड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केले. गांधीगिरीने प्रवाशांना सुखद धक्का बसला असला तरी अधिकाºयांच्या डोळ्यात अंजन घालण्याचाही प्रयत्न झाला..
हेळगाव-मसूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी खडी पसरली असली तरी डांबर वापरल्याचे दिसत नाही. परिणामी, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. संबंधित ठेकेदाराने हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली. चिपळूण-विजापूर राज्यमार्गावरील उंब्रज ते मसूरपर्यंतच्या रस्त्याचे दुरुस्तीचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्यातील खड्डे दहा दिवसांपूर्वी मुजविले असले तरी पुन्हा खड्डे उखडण्यास सुरुवात झाली आहे. यावरून गुणवत्ता लक्षात येते. यातून जनतेच्या पैशाचा अपव्यय होतोय. ही कामे दर्जेदार व्हावी, यासाठी निवेदने दिले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी प्रवाशांना गुलाबपुष्प दिले.
रोहित पाटील, अजिंक्य कदम, प्रमोद जगदाळे, धैर्यशील जगताप उपस्थित होते.