खंबाटकी घाटातील वाहतूक तीन तास ठप्प श्वासही गुदमरला : बोगद्यात वाहनांची कोंडी अन् धुराचा लोट

By Admin | Updated: May 10, 2014 23:38 IST2014-05-10T23:38:13+5:302014-05-10T23:38:13+5:30

खंडाळा : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाटात एसटी बस बंद पडल्याने वाहतूक तब्बल तीन तास ठप्प होती. घाटमार्ग बंद झाल्याने वाहतूक

Transportation in Khambatki Ghat, for three hours, jumped breathlessly: the vehicle's dump and smoke loom | खंबाटकी घाटातील वाहतूक तीन तास ठप्प श्वासही गुदमरला : बोगद्यात वाहनांची कोंडी अन् धुराचा लोट

खंबाटकी घाटातील वाहतूक तीन तास ठप्प श्वासही गुदमरला : बोगद्यात वाहनांची कोंडी अन् धुराचा लोट

 खंडाळा : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाटात एसटी बस बंद पडल्याने वाहतूक तब्बल तीन तास ठप्प होती. घाटमार्ग बंद झाल्याने वाहतूक बोगद्यामार्गे दुहेरी वळवण्यात आली. बोगद्यातही गाड्या अडकल्याने बोगदाही ठप्प झाला. त्यामुळे बोगद्यात अडकलेल्या प्रवाशांना काहीकाळ गुदमरले. बस काढण्यासाठी आलेले क्रेन बसचालक व वाहक जागेवर नसल्याने तासभर थांबून निघून गेले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही. परिणामी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मुंबईहून सातारामार्गे मेढ्याला निघालेली बस (एमएच १४ बीटी २९१९) ही सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटात मध्यावर बंद पडली. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनांना जाण्यासाठी रस्ताच उरला नाही. त्यामुळे घाटातील दत्त मंदिरापासून ते जुन्या टोलनाक्यापर्यंत चार किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. घाट बंद पडल्याने वाहतूक पोलिसांना बोगद्यामार्गे वळविली. मात्र, बोगद्यातून दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू झाल्याने बोगद्यात ओव्हरटेक करण्यामुळे वाहने अडकली. त्यामुळे तीही वाहतूक ठप्प झाली. बोगद्यात अडकलेल्या गाड्यांमधील प्रवाशांची मात्र दयनीय अवस्था झाली. बोगद्यात कमी असणारी हवा त्यातच गाड्यांचा धूर यामुळे प्रवाशांना श्वास घेणे सुद्धा मुश्किल बनले. काही प्रवाशांनी उतरून बोगद्यातून बाहेर जाण्याचा मार्ग स्वीकारला. तर काहीना गाडीतच पाण्याची आवश्यकता भासली. बोगद्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी खंडाळा पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दरम्यान, घाटात अडकलेली क्रेन काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. मात्र, के्रन येईपर्यंत बसचे चालक व वाहक गाडीजवळ नसल्याने बस बाजूला काढता आले नाही. तब्बल तासभर वाट पाहिल्यानंतर क्रेन आल्यापावली परत गेले. त्यानंतर पुन्हा क्रेन मागवून एसटी बस बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी स्वत: बोगद्यात जाऊन वाहतूक सुरळीत केली. तब्बल तीन तासांनंतर महामार्गाची वाहतूक पूर्वपदावर आली. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)

Web Title: Transportation in Khambatki Ghat, for three hours, jumped breathlessly: the vehicle's dump and smoke loom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.