शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोणंद बाजार आवारात एसटीतून कांद्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:24 IST

लोणंदचा कांदा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या कांद्याने आजवर संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तारले आहे. कांदा आजवर मालट्रक, रेल्वेने तर इतर प्रदेशात जहाजाने व विमानानेही गेला आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या एसटीला लोणंदच्या कांद्यानेही मदतीचा हात दिला आहे. लोणंदचा कांदा शुक्रवारी प्रथमच एसटीने पाठविण्यात आला.

ठळक मुद्देलोणंद बाजार आवारात एसटीतून कांद्याची वाहतूकपुणे, मुंबईला माल वाहतूक एसटीने पोहोच

संतोष खरातलोणंद : लोणंदचा कांदा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या कांद्याने आजवर संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तारले आहे. कांदा आजवर मालट्रक, रेल्वेने तर इतर प्रदेशात जहाजाने व विमानानेही गेला आहे. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या एसटीला लोणंदच्या कांद्यानेही मदतीचा हात दिला आहे. लोणंदचा कांदा शुक्रवारी प्रथमच एसटीने पाठविण्यात आला.सर्वसामान्यांची जीवनवाहिनी राहिलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या फेऱ्या कोरोनानंतर सुरक्षेच्या कारणाने बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीयांना मूळगावी जाण्यासाठी एसटीने मोठी भूमिका पार पाडली. आता जिल्हांतर्गत फेºया सुरू आहेत. पण प्रवासीच अध्याप बाहेर पडत नाहीत. तसेच एका फेरीत निम्मेच प्रवासी घ्यायचे असल्याने एसटी अडचणीत येऊ लागली आहे.एसटीची ही परिस्थिती सुधारण्यासाठी आजवर प्रवासी वाहतूक करणारी एसटी आता मालवाहतूकही करेल, असा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला. त्याला राज्यभरात सुरुवातही झाली आहे. सातारा विभागाचे वरिष्ठ अधिकारीही यासाठी प्रयत्न करत आहेत. आजवर पुणे, मुंबईला माल वाहतूक एसटीने केली आहे. आता बाजार समितीतील कृषी माल पोहोचविला आहे.लोणंद बाजार आवारात कांद्याची वाहतूक एसटीने महामंडळामार्फत चालू केली असून, खंडाळा आगाराने त्याची व्यवस्था केली. शुक्रवारी लोणंद मार्केट यार्डमधील कांद्याचे व्यापारी राजू अग्रवाल यांनी कऱ्हाड येथे कांदा एसटी मार्फत पाठविला.यावेळी बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय बिचुकले, सचिव विठ्ठल सपकाळ, सहायक सचिव शेळके व इतर कर्मचारी तसेच व्यापारी राजू अग्रवाल, गोकुळदास शहा, रामदास सोळस्कर, हमाल तसेच कऱ्हाड येथील कांदा व्यापारी संतोष बागल, अमोल कांबळे उपस्थित होते.

 

टॅग्स :onionकांदाSatara areaसातारा परिसर