शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
2
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
3
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
4
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
5
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
6
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
7
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
8
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
9
"मी सनातन धर्माचा…"; गीता पठणासंदर्भात हुमायूं कबीर यांचं वक्तव्य, केली मोठी घोषणा!
10
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
11
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
12
कोकणात मोठा प्रतिसाद, मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची करा; प्रवाशांची मागणी पूर्ण कधी होईल?
13
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
14
पाकिस्तानचे पुन्हा तुकडे होणार? मंत्र्याच्या वक्तव्याने नवा वाद, तज्ञांनी व्यक्त केली चिंता...
15
"एक-दोन नाही, हजारो कपल्सच्या रोमान्सचे व्हिडीओ रेकॉर्ड"; आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
17
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
18
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
19
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
20
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

चारा-पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने मेंढपाळांचे कोकणात स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:21 IST

अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे

ठळक मुद्देवाई तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढलीउन्हाच्या तीव्रतेमुुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटले

वाई : अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरे कसे जगवायची? हा प्रश्न सतावत आहे. या भागातील मेंढपाळ कोकणात स्थलांतर करू लागले आहेत.

या भागातच ओढे-जोड प्रकल्प राबविण्यात आले आहेत. परंतु दुष्काळ निवारण्यासाठी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाया गेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर काही भागात करण्यात येत आहे; पण मेंढ्या पाळणाºयांना पाण्याचा उपयोग होत नाही. ओढे, नाले, तलाव कोरडे पडल्याने प्राण्यांना पाणी पाजणे कठीण होते. 

वाई तालुक्याच्या पूर्व भागातील व खंडाळा, लोणंद, फलटण व उत्तर कोरेगाव परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांसह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. पाणी-चाºयासाठी कोयनानगर परिसरात आसरा घेणार असल्याचे मेंढपालांकडून समजले. ही अतिशय गंभीर बाब असून, मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

वाईच्या पूर्व भागात दुष्काळाची भीषणता जास्त पाहावयास मिळते. या भागात पावसाचे प्रमाण नेहमीच अत्यल्प असते. त्यात या परिसरात जलशिवारची कामेही शासनाकडून प्रभावीपणे न राबविल्याने या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भटकंती करणाºयाला याची मोठी झळ पोहोचते. या भागात कोणताही आधार शिल्लकच न राहिल्याने स्थलांतर केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, हे ओळखूनच मेंढपाळांनी स्थलांतराचा मार्ग निवडल्याचे चित्र आहे. कोयना परिसरात पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटला असलातरी चाºयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करावीदुष्काळ निवारण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. जर जनावरांसाठी शासन छावण्या उभारणार असेल तर त्यावेळी शेळ्या-मेंढ्यांचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर